सभापती घुमटकर यांचे सह्याचे अधिकार काढल्याने आमदार मोहिते पाटील यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:48+5:302021-08-25T04:13:48+5:30

बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर व सचिव बाळासाहेब धंद्रे यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले. संचालकांचे हे कृत्य बेकायदेशीर असून ...

MLA Mohite Patil is displeased with the removal of Speaker Ghumatkar's right to sign | सभापती घुमटकर यांचे सह्याचे अधिकार काढल्याने आमदार मोहिते पाटील यांची नाराजी

सभापती घुमटकर यांचे सह्याचे अधिकार काढल्याने आमदार मोहिते पाटील यांची नाराजी

Next

बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर व सचिव बाळासाहेब धंद्रे यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले. संचालकांचे हे कृत्य बेकायदेशीर असून पणन कायद्यानुसार असे अधिकार संचालक मंडळाला नाहीत. उलट सभापती घुमटकर यांचे अधिकार अबाधित आहेत. तसेच यासाठी संचालकांनी गठित केलेली चौकशी समिती सुध्दा नियमबाह्य आहे. सभापती घुमटकर यांचे काम अतिशय उत्तम, प्रामाणिक असून उल्लेखनीय आहे. असा खुलासा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. बाजार समितीतील समर्थक असलेल्या माजी सभापतींसह काही संचालकांच्या विरोधात आमदार मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर भाष्य केल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थक संचालकांचे बहुमत आहे. १६ पैकी १२ संचालक मोहिते पाटील यांच्या पॅनेलमधून निवडून आले आहेत. गेल्या पाच वर्षांत मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार सुरू आहे. संचालक मंडळाची मुदत संपली आहे. मात्र, कोरोनाच्या काळात १ वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. या काळात कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे संकेत आहेत. बाजार समितीची मासिक सभा ८ ऑगस्टला झाली होती. त्यात विकासकामे व आडते लायसन्स देण्यावरून सभापती विनायक घुमटकर यांना लक्ष करून संचालक मंडळाने सह्यांचे अधिकार काढून घेतले. या कारवाईत आमदार समर्थक व सभापती होऊन गेलेल्या ज्येष्ठ संचालकांनी पुढाकार घेतला. त्याला विरोधी पॅनेलच्या संचालकांनी समर्थन दिले. त्यावरून आमदार मोहिते पाटील यांनी मला वा पक्षाच्या जबाबदार व्यक्तीला माहिती न देता बाजार समितीच्या बैठकीत संचालकांनी घेतलेली ही भूमिका माझ्या व पक्षाच्या विरोधात आहे. त्याची चौकशी केली जाईल. असे मोहिते पाटील म्हणाले. सभापती विनायक घुमटकर यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढवणारी अनेक प्रलंबित कामे पूर्ण केली. त्या प्रत्येक कामात मी लक्ष दिले आहे. गेली पंधरा वर्षे मी पणन महामंडळ संचालक पदी असल्याने अनेक कामे व त्याला मंजुरी मिळाली. त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग घुमटकर यांच्या काळात झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, अॅन्ड सुखदेव पानसरे, माजी सभापती रमेश राळे, लक्ष्मण टोपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवडी या वेळी उपस्थित होते.

Web Title: MLA Mohite Patil is displeased with the removal of Speaker Ghumatkar's right to sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.