आमदार राहुल कुल प्रकरण : स्टंट की अफवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:56 AM2018-10-05T01:56:17+5:302018-10-05T01:56:34+5:30

रमेश थोरात : पकडलेले दोन आरोपी कोणाचे कार्यकर्ते?

MLA Rahul Kulkarni: The rumors of the stunts? | आमदार राहुल कुल प्रकरण : स्टंट की अफवा?

आमदार राहुल कुल प्रकरण : स्टंट की अफवा?

Next

दौंड : आमदार राहुल कुल यांच्या खुनाच्या कटासंदर्भातील योग्य वस्तुस्थिती पुढे आणून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलावीत. या प्रकरणात विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसला गोवण्याचा प्रयत्न करू नये. कारण या प्रकरणात सापडलेले आरोपी कोण आहेत आणि कोणाचे कार्यकर्ते आहेत, हे तालुक्याला उघड झाले असल्याचे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कुल यांच्या खूनाच्या कटा संदर्भात पोलिसांनी तत्परतेने दोघांना अटक केलेली असताना राष्ट्रवादीचे नाव घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
अटक केलेले दोघे कुणाचे कार्यकर्ते आहेत हे तालुक्याला माहित आहे. तेव्हा आरोपींचा कटाचा हेतू काय होता किंवा ही अफवा आहे की स्टंटबाजी आहे. हे पोलिसांनी उघड करुन जनतेसमोर वस्तुस्थिती आणावी. अन्यथा इतर तालुक्यासह दौंड तालुक्यातही सहानुभूती मिळविण्याचा पायंडा पडायला सुरुवात होईल. तालुक्यात दमदाटी कोण करीत आहे आणि शांततेच्या मार्गाने कोण चालले आहे. हे जनतेला माहित असल्याचेही ते म्हणाले.

आमदार कुल यांनी चांगले काम केलेले विरोधकांना देखवत नाही. हे काम राष्ट्रवादीच्या चोर भामट्यांनी केले आहे अशी पोस्ट फेसबुकवर पिंटू शेंडगे या कार्यकर्त्याने टाकली. दरम्यान, या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्याकडे तक्रार दिली असून या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे थोरात म्हणाले.
 

Web Title: MLA Rahul Kulkarni: The rumors of the stunts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे