आमदार सुनिल टिंगरेंना दुसऱ्यांदा कोरोना; मनपा आयुक्तांसोबत केली होती लोहगाव परिसराची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:26 PM2022-01-13T18:26:31+5:302022-01-13T18:26:47+5:30

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय,धानोरी,लोहगाव भागाची पाहणी दौरा केला होता

mla sunil tingare affected corona the second time He had inspected the Lohgaon area with the Municipal Commissioner vikram kumar | आमदार सुनिल टिंगरेंना दुसऱ्यांदा कोरोना; मनपा आयुक्तांसोबत केली होती लोहगाव परिसराची पाहणी

आमदार सुनिल टिंगरेंना दुसऱ्यांदा कोरोना; मनपा आयुक्तांसोबत केली होती लोहगाव परिसराची पाहणी

Next

चंदननगर : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असुन याबाबची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दिली आहे.

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय,धानोरी,लोहगाव भागाची पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आमदार सुनिल टिंगरे यांसह मोठा संख्येने पदाधिकारी असल्याने त्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. याबाबत आमदार सुनिल टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृती उत्तम असून थोडीशी कणकण वाटली म्हणून चाचणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

Web Title: mla sunil tingare affected corona the second time He had inspected the Lohgaon area with the Municipal Commissioner vikram kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.