आमदार थोपटेंनी ग्रामस्थांना दिली रिहेच्या विकासकामांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:52+5:302021-06-25T04:08:52+5:30
घोटवडे (शेळकेवाडी ) ते आंधळे या १४ की मी रस्त्याचे नुकतेच डांबरीकरणं व गरज असेल तेथे सिमेंट रस्ता तयार ...
घोटवडे (शेळकेवाडी ) ते आंधळे या १४ की मी रस्त्याचे नुकतेच डांबरीकरणं व गरज असेल तेथे सिमेंट रस्ता तयार झाला परंतु पावसाने रस्त्यावर खड्डे पडलेत ते भरण्यासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत, आंधळे रस्त्यावर रिहे गावचा जुना पूल अतिशय अरुंद असून त्यावर खड्डे पडले आहेत, पिंपळोली गावाचा पुलही खड्डेमय झाला असून त्या दोन्ही पुलास नूतनीकरणास निधी मंजूर झाला आहे. त्या कामाला पावसाळ्यानंतर सुरू होईल परंतु आता खड्डे भरण्यास बांधकाम खात्यास सांगितले. प्रास्तावित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पश्चिम रिंगरोड बाबत चर्चा झाली.
यावेळी माजी चेअरमन नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर पडाळघरे, माजी सरपंच अनिल मोरे, बाबाजी शेळके, सरपंच भूषण बोडके, उपसरपंच नवनाथ ओझरकर, ग्रामपंचायत सदस्य शेखर शिंदे, कमलेश ओझरकर, संभाजी ओझरकर, दिलीप मोरे, सचिन बोरकर, शेखर ओझरकर, अनिल मोरे उपस्थित होते.