वाघोलीतील कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:08+5:302021-04-20T04:11:08+5:30

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बीजेएस काॅलेजमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आमदार अशोक पवार ...

MLAs inspect Kovid Center in Wagholi | वाघोलीतील कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी

वाघोलीतील कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी

Next

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बीजेएस काॅलेजमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आमदार अशोक पवार यांनी भेट देत पाहणी करून आढावा घेतला.

या वेळी आमदार अशोक पवार यांनी कोविड सेंटरची पाहणी करत तेथील रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या सोयीसुविधांसह जेवणाची पाहणी केली. तर रुग्णांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशा सबंधितांना आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या. या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून वाघोली कोविड सेंटरसाठी तीन डाॅक्टर देण्याची मागणी करत तत्काळ दोन डाॅक्टरांच्या नियुक्तीला मजुंरी मिळवण्यात आली. परिसरातील वाढती रुग्णसंख्या पाहता खासगी रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना बेड मिळत नाहीत. रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या पडत असल्याने साधारण लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड सेंटर उपयुक्त ठरत असल्याने सेंटरमध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. वाघोली येथे वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता आमदार अशोक पवार यांच्या मागणीने हवेली तालुक्यात सर्वात आधी वाघोली येथील सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले. यासाठी आमदार अशोक पवार स्वतः पाठपुरावा करत होते, असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले.

यावेळी हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार विजयकुमार चोंबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन खरात, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे, वैद्यकीय आधिकारी वर्षा गायकवाड, नोडल अधिकारी बाळासाहेब मखरे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे, रामभाऊ दाभाडे, बाळासाहेब सातव, ग्रामविकास अधिकारी अनिल कुभांर, सचिन धुमाळ, सुरेश वांढेकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, वाघोलीतील नागरिक उपस्थित होते.

प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा

वाघोली परिसरात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येईल व आरोग्य संबंधीच्या सर्व सुविधा मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून नागरिकांना त्या उपलब्ध करून देण्यात येतील असे देखील आमदारांनी यावेळी सांगितले.

फोटो - वाघोली कोविड सेंटर

Web Title: MLAs inspect Kovid Center in Wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.