Pune: मनसेचा १६ वर्धापनदिन यंदा पुण्यात साजरा होणार; राज्यभरातून मनसैनिक दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:15 PM2022-02-25T16:15:58+5:302022-02-25T16:16:15+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे

MNS 16th anniversary will be celebrated in Pune this year mns workers will arrive from all over the state | Pune: मनसेचा १६ वर्धापनदिन यंदा पुण्यात साजरा होणार; राज्यभरातून मनसैनिक दाखल होणार

Pune: मनसेचा १६ वर्धापनदिन यंदा पुण्यात साजरा होणार; राज्यभरातून मनसैनिक दाखल होणार

Next

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यातच पुढील महिन्यात ९ मार्चला मनसेचा वर्धापनदिन आहे. यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार आहे. अशी माहिती पक्षाचे नेते बाबू वागसकर यांनी दिली आहे. 

वागसकर म्हणाले, मार्चच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यक्रम असतो. पण यंदा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे. राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उद्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर 

आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल होणार आहेत. उद्या दिवसभर राज ठाकरे यांच्या हस्ते शहरातील दोन शाखांचे उदघाटन होणार आहे. तसेच एस एम जोशी सभागृहात होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.   

Web Title: MNS 16th anniversary will be celebrated in Pune this year mns workers will arrive from all over the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.