पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू; अजय शिंदे, हेमंत संभूस यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:17 PM2022-05-04T12:17:09+5:302022-05-04T12:38:43+5:30
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात पोलिसांकडून धरपकड सुरू...
पुणे : आज पुण्यात खालकर चौकात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती केली. त्यानंतर कसबा पेठेतील प्राचीन पुण्येश्वर मंदिरात महाआरतीसाठी निघाले असताना पोलिसांनीमनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे आणि इतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आजपासून मनसेने मस्जिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेने आंदोलन छेडले आहे. जर मस्जिदीवर भोंगे वाजले तर त्याचठिकाणी मनसे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.
शहरात कोणताही अनुसुचित प्रकार ठाळण्यासाठी पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेणे सुरू केले आहे. अनेक भागात पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे. अजय शिंदे सोबतच शहरातील मनसेचे पदाधिकारी हेमंतर संभूस यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वारजे भागातही मसनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. इथे आंदोलनपूर्वीच निवडक कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतले. यामध्ये कैलास दांगट, गणेश धुमाळ, निलेश जोरी, यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद-
काही वेळातच मनसे प्रमुुख राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 1 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याने त्यावेळी ती कोणती भूमिका घेतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज्यभरात आज मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. त्यामुळे ठाकरे पत्रकार परिषदेत जी भूमिका घेतील त्यावरू मनसेच्या आंदोलनाची दिशा ठरेल.
तर तमाशा होईल...!
काल मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जर राज ठाकरेंना अटक झाली तर पुण्यात जो तमाशा होईल त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल याची नोंद सरकारने घ्यावी, असे सांगितले होते. याबद्दलची माहिती बाबर यांनी समाजमाध्यमावर दिली होती.