पुण्यात मनसेचं शिबीर; राज ठाकरे ठरवणार 'इंजिना'ची पुढची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:25 PM2019-12-20T12:25:02+5:302019-12-20T12:40:19+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संवाद शिबीराला पुण्यात सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कार्यक्रमस्थळी पोचले आहेत. दिवंगत अभिनेते डॉ श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेऊन ठाकरे कात्रज येथील शिबीरात पोचले आहेत. 

MNS camp begins in Pune; Amit Thackeray along with Raj Thackeray were also present | पुण्यात मनसेचं शिबीर; राज ठाकरे ठरवणार 'इंजिना'ची पुढची दिशा

पुण्यात मनसेचं शिबीर; राज ठाकरे ठरवणार 'इंजिना'ची पुढची दिशा

googlenewsNext

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संवाद शिबीराला पुण्यात सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कार्यक्रमस्थळी पोचले आहेत. दिवंगत अभिनेते डॉ श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेऊन ठाकरे कात्रज येथील शिबीरात पोचले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.  या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे. हे दोनही कार्यक्रम निमंत्रित कार्यकर्त्यांसाठी असून बैठकीत मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी आहे.

विधानसभा निवडणुकींनंतर ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला नव्हता. त्यातच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला ठाकरे यांनी पाठिंबा आणि विरोध न करता तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे त्यांची पक्षांतर्गत आणि राजकीय भूमिका काय आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. अखेर भूमिका स्पष्ट करणे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या शिबीराकरिता मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर उपस्थित आहेत. तसेच अमित ठाकरे यांनीही हजेरी लावली आहे. 

याबाबत मनसेचे नेते बाबू वागस्कर म्हणाले की, 'पक्षवाढ, निर्णय आणि संबंधित विषयांवर राज ठाकरे संवाद साधणार आहे. महाराष्ट्रातले साधारण ८५० पदाधिकारी आज एकत्र आहेत. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि विचार विनिमय आज करण्यात येणार आहे.

Web Title: MNS camp begins in Pune; Amit Thackeray along with Raj Thackeray were also present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.