पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:49 PM2024-10-22T23:49:41+5:302024-10-22T23:51:21+5:30

साईनाथ बाबर आणि मयुरेश वांजळे या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे. 

MNS candidates announced for Kothrud, Khadakwasla, Hadapsar constituencies in Pune | पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर

पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. त्यामध्ये कोथरूड मधून किशोर शिंदे, हडपसर मधून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि खडकवासला मतदारसंघातून मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणुक मनसे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी आज मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी जाहीर केले आहे. या यादीमध्ये पुणे शहरातील आठ मतदारसंघांपेकी कोथरूड हडपसर आणि खडकवासला मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे , हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून यापूर्वी निवडून आलेले कै. रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघांमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. कोथरूडमधून यापूर्वी मनसेकडून किशोर शिंदे यांनी निवडणूक लढविली आहे. साईनाथ बाबर आणि मयुरेश वांजळे या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे. 

Web Title: MNS candidates announced for Kothrud, Khadakwasla, Hadapsar constituencies in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.