Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा थोड्याच वेळात सुरु होणार; बृजभूषण, मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 10:18 AM2022-05-22T10:18:13+5:302022-05-22T10:18:21+5:30

पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला.

MNS Chief Raj Thackeray's meeting will start shortly; BJP MP Brijbhushan Singh And CM Uddhav Thackeray Target? | Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा थोड्याच वेळात सुरु होणार; बृजभूषण, मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणार?

Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा थोड्याच वेळात सुरु होणार; बृजभूषण, मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणार?

Next

पुणे- मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात थोड्याच वेळात सभा सुरु होणार आहे. 

पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, भाजप सरकार बृजभूषण सिंह असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध १३ अटी पोलिसांनी घातल्या आहेत. राज ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत. घोषणाबाजी करू नये तसेच सभेला येणाऱ्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेऱ्या काढू नयेत, यासह विविध १३ अटींवर सभेला परवानगी देण्यात आली, असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितले.

Web Title: MNS Chief Raj Thackeray's meeting will start shortly; BJP MP Brijbhushan Singh And CM Uddhav Thackeray Target?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.