मनसे शहराध्यक्षाविनाच!

By admin | Published: March 11, 2016 01:37 AM2016-03-11T01:37:12+5:302016-03-11T01:37:12+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन बुधवारी शहरात शहराध्यक्षाविनाच साजरा झाला. अनेक वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्षपद रिकामेच आहे.

MNS City Without City! | मनसे शहराध्यक्षाविनाच!

मनसे शहराध्यक्षाविनाच!

Next

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन बुधवारी शहरात शहराध्यक्षाविनाच साजरा झाला. अनेक वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्षपद रिकामेच आहे. नेतृत्वहीन मनसेचे इंजिन संथ गतीने मार्गक्रमण करीत आहे.
मनसेची स्थापना ९ मार्च २००६ ला झाली. त्याला बुधवारी १० वर्षे झाली. या कालावधी सतीश फुगे व मनोज साळुंके हे दोनच अध्यक्ष शहरास लाभले.
सन २००७ च्या महापालिका निडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने फुगे यांनी राजीनामा दिला, तर पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल साळुंके यांची २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हकालपट्टी झाली. अद्यापपर्यंत शहराध्यक्षपद रिक्त आहे. हे पद भरण्यासाठी अनेक मुलाखती आणि बैठका मुंबई, पुणे आणि शहरात झाल्या.
विधानसभा निवडणूक, गणेशोत्सव, दिवाळी, २०१६ नवीन वर्षापूर्वी, पुढे नवीन वर्षानंतर असे वेगवेगळे कारण देत पदावर नियुक्ती केली गेली नाही. वारंवार आग्रही मागणी करुनही त्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सहनशक्ती मावळत चालली आहे. मुलाखती आणि बैठका घेणे बंद करा, कोणत्याही परिस्थितीत शहराध्यक्ष निवडाच, अशी मागणी करून कार्यकर्ते थकले आहेत.
गेल्या महिन्यात मराठी राजभाषा दिवस शहरात उत्साहात साजरा केला गेला. पक्षाचा वर्धापन दिनही बुधवारी काही ठिकाणी साजरा झाला. या आणि महिला दिनानिमित्ताने एकत्रित कार्यक्रम घेतले गेले. मात्र, पक्षाला शहराध्यक्षच नसल्याने सर्व कार्यक्रम त्यांच्याविना होत आहेत.
नेतृत्वहीन असलेल्या पक्षाच्या इंजिनास संथगतीने वाटचाल करीत आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, मनसेचे इंजिन कर्णधाराविनाच अडखळत शहरात मार्गाक्रमण करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS City Without City!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.