पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 02:41 PM2020-09-07T14:41:11+5:302020-09-07T16:20:48+5:30

अधिकाऱ्यांनाही चांगल्या गाडीत फिरायचा अधिकार नाही.

MNS corporator breaks car of Pmc officers in Pune; Anger at not getting ambulance for funeral | पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

Next
ठळक मुद्देअंत्यविधीला रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने उद्रेक 

पुणे : शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असून लोकांना अंत्यविधीसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. या सोबतच रुग्णालयातून स्मशान भूमीमध्ये मृतदेह घेण्यासाठी शववाहिका मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. असाच अनुभव आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे या यांनी पुणे महापालिकेच्या व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांची गाडी फोडली. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पालिकेच्या आर्ट गॅलरीमध्ये घडली. 

 याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, पुणे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचा आकडाही वाढतो आहे. शहरांमध्ये काही ठराविक स्मशानभूमीतच होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना वेटिंगवर थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा आधीच संताप होत असतानाच रुग्णालयांमधून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्यासाठी शववाहिका / रुुगणवहिका उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

 

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या जवळच्या नातेवाईंकाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांनी उपचारासाठी पुणे महापालिकेकडून रुग्णवाहिका मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. तब्बल चार तास त्यांना रुग्णवाहिकेची वाट पहावी लागली. त्यामुळे अंत्यसंस्कारांना देखील उशीर झाला. तसेच स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंगवर थांबावे लागले. मुळात भारती विद्यापीठ रुग्णालय ते कात्रज स्मशानभूमी हे अंतर अवघे एक ते दीड किलोमीटरचे आहे. एवढ्या अंतरावर जाण्यासाठी चार तास वाट पाहावी लागते. जर एका नगरसेवकाच्या कुटुंबियांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होत असेल असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा पुरविता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गाड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही असे मोरे म्हणाले.

मोरे म्हणाले, महापालिकेच्या वेहिकल डेपो वरून रुग्णवाहिका पुरवल्या जाऊ शकत नसतील तर या विभागाचा उपयोग तरी काय? रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व्हेईकल डेपोची आहे. तर पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही विद्युत विभागाचे आहे. परंतु, या विभागांमध्ये समन्वय नसल्याने कामामध्ये ताळमेळ नाही.  रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह वाहून नेण्याकरिता शववाहिका उपलब्ध होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. एकीकडे प्रशासन सर्व काही सुरळीत असल्याचा दहावा करीत आहे. परंतु, दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना प्रशासकीय संवेदनशीलतेचा फटका बसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून मनसेने व्हेईकल डेपोचे प्रमुख नितीन उदास यांची गाडी फोडूूू आज मी माझा संताप व्यक्त केला आहे.  उद्या नागरिक रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करतील. नागरिकांनी उग्र रूप धारण करण्याआधी शासनाने व पालिका प्रशासनाने व्यवस्था सुधारावी.

Web Title: MNS corporator breaks car of Pmc officers in Pune; Anger at not getting ambulance for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.