घाटे हल्ला कटाशी ‘मनसे’चा संबंध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:28+5:302021-09-10T04:15:28+5:30
घाटे हल्ला कट प्रकरणी अटक झालेले तिघेही मनसेचे कार्यकर्ते वा पदाधिकारी नाहीत. उलट आरोपी विकी क्षीरसागर हा घाटे यांचाच ...
घाटे हल्ला कट प्रकरणी अटक झालेले तिघेही मनसेचे कार्यकर्ते वा पदाधिकारी नाहीत. उलट आरोपी विकी क्षीरसागर हा घाटे यांचाच जुना कार्यकर्ता असल्याचे घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेबद्दल नागरिकांमध्ये अकारण गैरसमज पसरू नयेत, असे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, प्रदेश उपाध्यक्ष ॲॅड. गणेश सातपुते आणि नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक घाटे यांच्यावर हल्ला करण्याचे उघड झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे आणि महेश आगलावे यांना अटक केली आहे. घाटे हे ३ सप्टेंबर रोजी दुपारी लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील एका हॉटेलात गेले असता त्यांना काहीजणांचा संशय आला. हाच प्रकार ६ सप्टेंबरला पुन्हा घडला. त्यानंतर घाटे यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही पाहिले तेव्हा त्यांना खात्री झाली की काहीजण त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने आले होते. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.