पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 07:34 PM2022-04-16T19:34:28+5:302022-04-16T19:49:17+5:30
महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले...
पुणे : 'जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणेने पुण्यातील खालकर चौक खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमान जयंतीनिमित्त (hanuman jayanti) मारुती मंदिरात साडे सातच्या सुमारास महाआरती पार पडली (raj thackeray maha aarti in pune). यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारपासून मंदिर परिसरात ढोलताशा, झांज पथक सुरू होते. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले. खालकर चौकात सगळीकडे हिंदूजननायक राज ठाकरे असे फलक लावले होते. त्या फलकावर मागे मारूती पुढे राज ठाकरे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे.
राज ठाकरे आंबा महोत्सवानंतर महाआरतीला जाणार होते पण अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सरळ महाआरतीसाठी खालकर चौकात आले होते आणि मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमूदायाला वाटप ही करण्यात आले होते. खालकर चौकात मनसैनिकानी मोठी गर्दी केली होती.
तर दुसरीकडे पुण्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि साखळीपीर राष्ट्रीय मारूती मंदिर यांच्या वतीने हिंदूकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.