निवडणुकीपूर्वी मनसेत खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:42+5:302021-03-04T04:20:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी, महापालिकेतील पक्षाचे गटनेते वसंत ...

MNS shrugs before elections | निवडणुकीपूर्वी मनसेत खांदेपालट

निवडणुकीपूर्वी मनसेत खांदेपालट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी, महापालिकेतील पक्षाचे गटनेते वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मावळते शहराध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे़

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात बैठक घेतल्यानंतर, शहर पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार असल्याचे बोलले जात होते. बुधवारी शहरातील पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी मुंबईत बोलावून या नियुक्त्या जाहीर केल्या़

सन २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी गटनेते म्हणून वसंत मोरे यांनी महापालिकेत पक्षाचे नेतृत्व केले होते. २०१७ च्या निवडणुकीत पालिकेत मनसेचे २ नगरसेवक निवडून आल्यावरही वसंत मोरे यांनी मनसेची आक्रमक भूमिका कायम ठेवली. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोरेंना उमेदवारी देण्यात आली होती. आता अवघ्या वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराची सूत्रे मोरे यांच्या हाती देण्यात आली आहेत़

चौकट

मनसेचे २९ पेक्षा जास्त नगरसेवक दिसतील

“शहरात पक्ष संघटन मजबूत करतानाच, कार्यकर्त्यांसाठी ‘होय मी नगरसेवक होणारच’ हे अभियान लवकरच राबविणार आहे. पालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मनसेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील यासाठी प्रयत्न असेल. सन २०२२ मध्ये महापालिकेत मनसेचे २९ पेक्षा जास्त नगरसेवक असतील,” असा विश्वास वसंत मोरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

चौकट

मोरे यांच्या नियुक्तीचा फायदाच

“पदाधिकारी बदलणे ही प्रक्रिया सर्वच पक्षात होत असते. वसंत मोरे यांचा पुणे महापालिकेतील अनुभव मोठा आहे. त्यांची मोरे नियुक्ती आणि त्यांचा अनुभव मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत फायदेशीर ठरेल,” असे मावळते शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले.

------------------------------------------

Web Title: MNS shrugs before elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.