पुण्याचा मनसैनिकाने शोधला नदी शुद्ध करायचा सोपा पर्याय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:47 PM2021-03-13T18:47:35+5:302021-03-13T18:49:42+5:30

मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अनुसरून तयार केली 'प्रकल्प प्रतिकृती' * अमित राऊत यांनी तयार केलेल्या 'प्रकल्पाचे' ठाकरेंकडून कौतुक

MNS worker creates a model to purify river water. MNS Leader Raj Thackeray asks him to present it to all corporations | पुण्याचा मनसैनिकाने शोधला नदी शुद्ध करायचा सोपा पर्याय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...

पुण्याचा मनसैनिकाने शोधला नदी शुद्ध करायचा सोपा पर्याय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...

Next

मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प तसेच सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून  सादर केला आहे.
'मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ' व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो. याचा आढवाच या प्रकल्प प्रतिकृतीत देखाव्याच्या स्वरूपात दाखविण्यात आला आहे.
महापालिकेकडून पुरविण्यात येणारे शुद्ध पाणी वापरून झाल्यावर ते सरळ नदी मध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास, नद्या, नाले स्वछ राहू शकतात. व पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. तसेच नदीचेप्रदूषण न होता, मैल्यातून मिथेन, खत, गॅस निर्मिती होऊ शकते निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते याची प्रतिकृती चल दखाव्यातून तयार करून, त्याद्वारे उत्तम असे सादरीकरण राऊत यांनी केले आहे. मनसे 'ब्लू प्रिंट'ला साजेसा असा हा प्रकल्प सोसायटी स्तरापासून, झोपडपट्टी स्तरावर, मोठमोठ्या टाऊन शिपमध्ये तथा शहर पातळीवरही अंमलात येऊ शकतो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'ब्लू प्रिंट'ला अनुसरून तयार केलेल्या या प्रकल्पाचे सादरीकरण शनिवारी ( दि. १३ मार्च ) पुण्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर अमित राऊत यांनी केले. तेव्हा हे सादरीकरण महानगरपालिका आयुक्तांनाही दाखवावे आशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. यावेळी पक्षाचे 
शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह बाबू वागस्कर, किशोर शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title: MNS worker creates a model to purify river water. MNS Leader Raj Thackeray asks him to present it to all corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.