मनसे कार्यकर्त्यांनी उलगडले पराभवाचे ‘राज’

By admin | Published: November 19, 2014 04:21 AM2014-11-19T04:21:59+5:302014-11-19T04:21:59+5:30

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

MNS workers unleash 'Raj' defeat | मनसे कार्यकर्त्यांनी उलगडले पराभवाचे ‘राज’

मनसे कार्यकर्त्यांनी उलगडले पराभवाचे ‘राज’

Next

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीशिवाय थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी कार्यकर्त्यांनी राज यांच्यासमोरच पराभवाचे राज उघडले. तसेच, पदाधिकारी व नगरसेवकांच्या कामगिरीचा हिशेब मांडला.
विधानसभा निवडणुकीत राज्यभरात मनसेला केवळ एकच जागा मिळाली. या पराभवाची कारणमीमांसा करून नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी राज ठाकरे चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर मंगळवारी दाखल झाले.
पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्या वेळी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व काही
नगरसेवक त्यांच्यासोबत उपस्थित होते.
मतदारसंघनिहाय वेगवेगळ्या बैठका रद्द करून लॉ कॉलेज रस्ता येथील ‘राज महल’ येथे सकाळी १० पासून कसबा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांशी
त्यांनी संवाद साधला. शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
आतापर्यंत राज यांच्याजवळ जाण्यास घाबरत असलेल्या कार्यकर्त्यांना थेट बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी व तडजोडीविषयी रोखठोक मते मांडली. राजभेटीने कार्यकर्त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढलेला दिसत होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या राजभेटीने मनसे पदाधिकारी व नगरसेवक चिंतेत होते.
(प्रतिनिधी)

Web Title: MNS workers unleash 'Raj' defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.