मनसेची 'मी मराठी स्वाक्षरी मराठी' व्यापक मोहीम, पुणेकरांची 'मनसे' दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:09 PM2021-02-27T16:09:19+5:302021-02-27T16:11:08+5:30
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सातत्याने आवाज उठविला जात असतो. सर्वत्र जागतिक मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने राज्यात 'मी मराठी,स्वाक्षरी मराठी' ही मोहिमेला सुरुवात केली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या वरिष्ठ नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदविला आहे. पुण्यात देखील मनसेकडून विविध ठिकाणी मराठी स्वाक्षरीच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर राज्य सरकारकडून सांस्कृतिक,राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेने 'मराठी स्वाक्षरी' ची व्यापक मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात देखील मंडई परिसरात 'मी मराठी,स्वाक्षरी मराठी' या उपक्रमाचे आयोजन वसंत खुटवड यांनी केले होते.
नागरिकांना मराठीतुन सही करण्याचा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी केल्यानंतर त्यांना मोफत मास्क दिले गेले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठी भाषेपेक्षा इंग्रजीत सही करण्यास नागरिक प्राधान्य देतात. मराठी भाषा बाजुला दुर्लक्षित होऊ नये
नये.किमान महाराष्ट्रातील नागरिकांनी मराठी भाषा जतन करावी,तिचा अभिमान बाळगावा याकरिता मराठी स्वाक्षरीचा उपक्रम हाती घेतला आहे. या द्वारे मराठी भाषेचे महत्त्व पटवुन तसेच या उपक्रमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे वसंत खुटवड यांनी यावेळी सांगितले.
शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या कुटुंबाची मराठी स्वाक्षरी
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु आजही ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले. ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी दादूचं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.