मनसेचे शिंदे-सरकार यांचा भाजपात प्रवेश,आमदार मुळीक उपस्थित, १३ वर्षे केली होते कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:06 AM2017-11-24T01:06:24+5:302017-11-24T01:06:34+5:30
विमाननगर : लोहगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिग्गज नेतृत्व, विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
विमाननगर : लोहगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिग्गज नेतृत्व, विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
शहराच्या पूर्व भागातील यशस्वी उद्योजक असलेले मनसे स्थापनेपासून तेरा वर्षे पक्षात शिंदे-सरकार यांनी काम केले आहे. त्यांनी शहर संघटक, उपाध्यक्ष, सचिव म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे मतदारसंघ विभागध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूकदेखील मनसेकडून लढवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन शिंदे-सरकार यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार मुळीक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आमदार मुळीक यांनी त्यांचे स्वागत केले. शिंदे यांच्यासोबत मनसेतील विजय सूर्यवंशी, विवेक टिंगरे, श्याम शिंदे, अमित गिरी, राजेंद्र खंदारे, नवनाथ टेकवडे, हिम्मत सिंग, संजय वावरे, नानाभाऊ भदाणे यांसह लोहगाव येथील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार मुळीक, संतोष राजगुरू, संतोष (लाला) खांदवे, अरविंद गोरे, उत्तमराव शिंदे-सरकार ज्ञानेश्वर बाबर, हनुमंत खांदवे, सुनील नायर, अमित जाधव, संतोष घोलप आदी उपस्थित होते.