मतदारांसाठी मोबाइल अ‍ॅप

By admin | Published: November 18, 2016 04:39 AM2016-11-18T04:39:05+5:302016-11-18T04:39:05+5:30

मतदार आणि नागरिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केला आहे. त्यात प्रगणकांना मतदारांची माहिती भरता येणार आहे.

Mobile app for voters | मतदारांसाठी मोबाइल अ‍ॅप

मतदारांसाठी मोबाइल अ‍ॅप

Next

पिंपरी : मतदार आणि नागरिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केला आहे. त्यात प्रगणकांना मतदारांची माहिती भरता येणार आहे. त्यातून मतदार याद्यांसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात मतदार याद्यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘‘मतदार याद्यांविषयक प्रशिक्षण आज देण्यात आले. मतदार याद्या अपडेट करताना प्रगणक घरोघरी जाऊन माहिती घेतात. त्याचा चार्ट भरून घेतात. नंतर हा चार्ट अपलोड केला जातो. नवीन अ‍ॅपची निर्मिती निवडणूक आयोगाने केली आहे. मतदार आणि नागरिकांसाठी हा अ‍ॅप विकसित केला आहे. मतदार याद्यांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्यावर होम स्क्रीन, त्यात मतदार चार्ट ज्या कर्मचाऱ्यांचे नियंत्रण अधिकाऱ्याचे आहे. त्याचा कोड देऊन लॉगीन करायचे आहे.
त्यानंतर मतदारांचे स्थलांतर, राहत आहे किंवा मयत याविषयीची माहिती भरायची आहे. कंट्रोल चार्ट तयार करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर डाटा अपलोड करायचा आहे. त्यामुळे ज्या विभागाचे त्याच विभागात मतदार असतील.’’
सहायक आयुक्त योगेश कडूसकर, सहायक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते. ट्रू व्होटर अ‍ॅप या नवीन अ‍ॅपविषयी कडूसकर यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile app for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.