मोबाइल, वाहनचोर गजाआड

By admin | Published: March 28, 2017 02:28 AM2017-03-28T02:28:49+5:302017-03-28T02:28:49+5:30

मोबाइल शॉपी फोडणाऱ्या आणि वाहनचोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई पिंपरी

Mobile, cargo gauge closure | मोबाइल, वाहनचोर गजाआड

मोबाइल, वाहनचोर गजाआड

Next

पिंपरी : मोबाइल शॉपी फोडणाऱ्या आणि वाहनचोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई पिंपरी मंडई येथे करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृष्णा बाबू जलनिला (वय २२) आणि विशाल नामदेव गुंजाळ (वय २२, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
गस्त घालत असताना पिंपरीतील भाजी मंडई येथे आरोपी चोरीचे मोबाइल विक्री करीत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोबाइलविषयी विचारणा केली असता, चिंचवड, रामनगर येथील जय भवानी मोबाइल शॉपी फोडून आणल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकड़ून विविध नामांकित कंपन्यांचे ३५ हजार रुपये किमतीचे नऊ मोबाइल जप्त केले आहेत.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई
झाली. निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, हरीष माने, सहायक फौजदार अरुण बुधकर, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, शाकीर जेनेडी, महादेव जावळे, लक्ष्मण आढारी, संतोष दिघे, दादा धस, शैलेश मगर, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर आणि संतोष भालेराव यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. (प्रतिनिधी)

चौकशीनंतर आरोपींची कबुली
पोलीस कोठडीत असताना आरोपींकडे कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांनी दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या. पिंपरी पोलीस ठाण्याकडील तीन, कोरेगाव आणि विश्रांतवाडीतील एक असे वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. कृष्णा जलनिला हा सराईत आहे. त्याच्यावर निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Mobile, cargo gauge closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.