मोबाईल व वाहनचोरी करणाऱ्या बालकास घेतले ताब्यात, १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:41+5:302021-08-24T04:14:41+5:30

सदर विधिसंघर्षित बालक हे सध्या किरकटवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, खडकवासला, पुणे येथे राहात असून, ते मूळ बेलूरगी, जि. गुलबर्गा, राज्य ...

Mobile phone and vehicle theft child arrested, property worth Rs 1 lakh 9,000 confiscated | मोबाईल व वाहनचोरी करणाऱ्या बालकास घेतले ताब्यात, १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल व वाहनचोरी करणाऱ्या बालकास घेतले ताब्यात, १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next

सदर विधिसंघर्षित बालक हे सध्या किरकटवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, खडकवासला, पुणे येथे राहात असून, ते मूळ बेलूरगी, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक येथे राहणारे आहे. त्याच्याकडून दोन मोटारसायकल व पाच मोबाईल फोन असा एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर, हेमंत कामठे व महेश भोंगळे हे गस्त घालीत असताना लक्ष्मी वजन काटा येथे एक मुलगा संशयितरीत्या दुचाकीवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशीत त्याने लोणी काळभोर, हडपसर व सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ मोटरसायकल, ५ मोबाईल फोन असा १ लाख ९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला असल्याची कबुली दिली. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, निकेतन निंबाळकर, अमृता काटे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अविनाश जोशी, विनोद कांबळे, महेश भोंगळे, सागर वणवे, हेमंत कामढे, अभिजित टिळेकर, बिभिषन कुंटेवाड, दीपक सोनवणे यांनी केलेली आहे.

Web Title: Mobile phone and vehicle theft child arrested, property worth Rs 1 lakh 9,000 confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.