अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाईल वापसी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:43+5:302021-08-27T04:14:43+5:30

शासनाने दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाची माहिती पाठविण्यासाठी मोबाईल दिले होते. सदरच्या मोबाईलची वाॅरंटी संपली असून ...

Mobile return agitation of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाईल वापसी आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाईल वापसी आंदोलन

googlenewsNext

शासनाने दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाची माहिती पाठविण्यासाठी मोबाईल दिले होते. सदरच्या मोबाईलची वाॅरंटी संपली असून जवळ जवळ सर्वच मोबाईल निकृष्ट दर्जाचे झाले आहे. परिणामी मोबाईल बिघडणे, रेंज न येणे , तसेच या मोबाईलमध्ये ॲप लोड होत नाही, अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अंगणवाडीतील दैनंदिन माहिती शासनाला पाठवताना अडचणी निर्माण होतात. तसेच मोबाईल बिघडल्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दुरुस्तीचा खर्च करावा लागतो. तेव्हा कामात उपयोगी पडण्याऐवजी ओझे ठरलेला मोबाईल आंदोलकांनी परत दिला. चांगल्या दर्जाचे मोबाईल अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मिळावे, मोबाईलमध्ये कामकाजाचे ॲप मराठीतून असावे, अशी मागणी आंदोलकांची होती.

याप्रसंगी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम, दौंड तालुका अध्यक्ष रेखा शितोळे, सचिव सुवर्णा शितोळे, मीना कुल, किरण जांबले, नंदा कोकरे या पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

२६ दौंड

दौंड येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोबाईल वापसी आंदोलन केले.

Web Title: Mobile return agitation of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.