करवसुलीसाठी मोबाईल टॉवरला सील
By admin | Published: March 18, 2017 04:36 AM2017-03-18T04:36:32+5:302017-03-18T04:36:32+5:30
नगरपालिकेने कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी शहरातील एअरसेल कंपनीचा मोबाईल टॉवर सील केला. तर काही गाळेधारक, दुकानांवर देखील हीच कारवाई करण्यात आली.
Next
बारामती : नगरपालिकेने कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी शहरातील एअरसेल कंपनीचा मोबाईल टॉवर सील केला. तर काही गाळेधारक, दुकानांवर देखील हीच कारवाई करण्यात आली.
नगरपालिकेने थकीत करवसुली, पाणीपट्टीसाठी कडक धोरण अवलंबले आहे. जादा थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांवर जप्ती कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी अशा मिळकतधारकांची नावे जाहीर करण्यात आली होती. आज एअरसेल कंपनीच्या मोबाईल टॉवर सील करण्यात आला. त्याचबरोबर दुकानांना टाळे ठोकले. (वार्ताहर)