साडे तेरा लाखांची रक्कम लुटणाऱ्या ओंकार गुंजाळ टोळीवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:20 PM2021-06-05T21:20:42+5:302021-06-05T21:20:53+5:30

ओंकार गुंजाळ व त्याच्या साथीदारांनी दोन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर एका मोटारचालकाला अडवून त्याच्याकडील साडे तेरा लाखांची रोकड लुटली होती

Mocca action against 13 lakh and 50 thousands cash theft Omkar Gunjal gang | साडे तेरा लाखांची रक्कम लुटणाऱ्या ओंकार गुंजाळ टोळीवर मोक्का कारवाई

साडे तेरा लाखांची रक्कम लुटणाऱ्या ओंकार गुंजाळ टोळीवर मोक्का कारवाई

Next

पुणे : नगर रस्त्यावर मोटारचालकाला धमकावून साडेतेरा लाखांची रोकड लुटणार्‍या ओंकार गुंजाळ व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. 

प्रदीप ऊर्फ यशवंत कोंढाळकर (वय २३, रा. केसनंद, ता. हवेली), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय १९, रा. बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता), ओंकार शंकर गुंजाळ (वय २४, रा. ओम शंकर निवास, बकोरी रस्ता, लोणीकंद, नगर रस्ता), गणेश रामदास काळे (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता), विजय नंदू राठोड (वय २२, रा. सुयोगनगर, वाघोली, नगर रस्ता) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

ओंकार गुंजाळ व त्याच्या साथीदारांनी दोन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर एका मोटारचालकाला अडवून त्याच्याकडील साडे तेरा लाखांची रोकड लुटली होती. या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हे शाखेने ओंकार गुंजाळसह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार, दुचाकी तसेच चोरीच्या पैशांतून खरेदी केलेले मोबाईल, फ्रिज, शेगडी, कपडे, ब्ल्यू टुथ हेडफोन तसेच चोरलेली ७ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

तपासादरम्यान, गुंजाळ टोळीप्रमुख असून त्याने साथीदारांच्या मदतीने लुटमार करणे, मारहाण करणे, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे संघटितपणे आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवून स्वत:चे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मोक्का प्रस्ताव पाठविला होता.

अशोक मोराळे यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन मोक्काचा अंर्तभाव करण्यास मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख पुढील तपास करीत आहेत. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारीचा समुळ उच्चाटन करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ३१ वी कारवाई असून या वर्षातील ही २६ वी कारवाई आहे.

Web Title: Mocca action against 13 lakh and 50 thousands cash theft Omkar Gunjal gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.