पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:31 PM2021-03-10T13:31:53+5:302021-03-10T13:32:04+5:30

ओंकार कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते.

Mocca action against Andekar gang in Pune city; 11 remanded in police custody till March 16 | पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : शहराच्या मध्य वस्तीतील सर्वात जुनी टोळी असलेल्या आंदेकर टोळीवर आता संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का अंतर्गत) कारवाई करण्यात आली. टोळीतील ११ जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. टोळीप्रमुख बंडु ऊर्फ सूर्यकांत आंदेकर (वय ६०, रा. नाना पेठ), नंदकुमार नाईक (वय ७२, रा. शुक्रवार पेठ) या दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऋषभ देवदत्त आंदेकर (वय २२, रा. रास्तापेठ), हितेंद्र विजय यादव (वय ३२), दानिश मुशीर शेख (वय २८), योगेश निवृत्ती डोंगरे (वय २८), विक्रम अशोक शितोळे (वय ३४), अक्षय दशरथ अकोलकर (वय २८), स्वराज उर्फ शक्ती निलंजय वाडेकर (वय १९, सर्व रा. नानापेठ), प्रतिक युवराज शिंदे (वय १८, रा. मंगळवारपेठ, जुना बाजार), यश संजय चव्हाण (वय १९, रा. लक्ष्मीनगर, आंबेडकर वसाहत, पर्वती), देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफांडे (वय २१, रा. रामगडवस्ती, विश्रांतवाडी) आणि वैभव नितीन शहापुरकर (वय १९, रा. नानापेठ, धनगरवाडा) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
----------------------

याबाबत ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. बांबु आळी, गणेश पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुडले आणि आंदेकर टोळीतील काही जणांचे वाद होते. कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने २१ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. कुडलेवर बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून साथीदारांनी वार केले होते. याप्रकरणी आंदेकरसह गाडी गण्या, सूरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आंदेकरला मध्यरात्री नाना पेठ भागातून अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी मोक्काच्या कारवाईच्या अनुषंगाने प्रस्ताव दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करत आहेत.

ओंकार कुडलेला मारण्यासाठी दिले ५ लाख

अटक करण्यात आलेले आरोपी हे आंदेकर टोळीतील सदस्य असून त्याच्यावर देखील गुन्हे दाखल असून ते सक्रीय गुन्हेगार आहेत. वर्चस्वाच्या वादातून व आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून खुनाचा प्रयत्न झाला आहे. पुणे शहरामध्ये मागील काही महिन्यात टोळी प्रमुख आंदेकर याच्या टोळीतील गुंडांनी समर्थ, बंडगार्डन, कोंढवा, विश्रामबाग व खडक पोलिस ठाण्याच्या परिसरात प्राणघातक हल्ले केले आहे. आंदेकर याने घातक शस्त्रे व वाहने व मनुष्यबळ पुरविणे याचे नियोजन करून आर्थिक पुरवठा केला आहे. त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत. बंडू आंदेकर याने एकाकडून १० लाख रूपये आणले होते. त्यापैकी ५ लाख रूपये त्याने स्वतःकडे ठेवून उर्वरित ५ लाख रूपये ओंकार कुडले याला ठार मारण्यासाठी दिले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही रक्कम त्याला कोणी दिली याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यातील हत्यारे, वाहने जप्त करायची आहेत. त्याने गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या व कुंटुंबाच्या नावावर स्थावर मालमत्ता निर्माण केली आहे. त्याने बँकेत काही रोकड गुंतवली आहे का ? याचा तपास करायचा आहे.

बंडू आंदेकर याला फरासखाना पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्यावर कायद्याचा कोणाताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या टोळीला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.

Web Title: Mocca action against Andekar gang in Pune city; 11 remanded in police custody till March 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.