पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:17 PM2021-05-25T22:17:25+5:302021-05-25T22:18:29+5:30

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात १४ ठिकाणी बलात्कार,दरोडा, जबरी चोरी यांसारखे २६ गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.

Mocca action against criminal gangs who crime in Pune, Satara and Solapur districts | पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई

Next

मोरगाव: पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील चौदा गावांत ५ दरोडेखोरांच्या टोळीने गेल्या काही वर्षापासून धुमाकूळ घातला होता. बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनकसवाडी येथे १६ फेब्रूवारी २०२१ रोजी  या टोळक्याने दरोडा टाकला होता. संबंधित टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे. 

याप्रकरणी अजय शरद भोसले (रा .नेर  ता.खटाव),दादा हनुमंत चव्हाण ( गाववडी विसापुर, ता खटाव), विकास किरण शिंदे (रा . नांदल ता फलटण जि . सातारा), रावश्या कोब्या काळे (रा लासुर्णे , ता . इंदापुर), कॅसेट उर्फ काशीनाथ उर्फ भिमराव भोसले (रा . आंदरुड ता फलटण) यांना अटक करुन १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर या दरोड्यातील आरोपी लखन पोपट भोसले (रा. वडगांव जयराम स्वामी ता. खटाव) हा फरारी आहे

या टोळक्याने पुणे जिल्ह्यातील  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या  हद्दीतील सोनकसवाडी, बारामती शहर, सोलापूर जिल्ह्यातील अकलुज, करमाळा  सातारा जिल्ह्यातील लोणंद,सातारा, फलटण आदी चौदा ठिकाणी बलात्कार,दरोडा, जबरी चोरी यांसारखे २६ गुन्हे या तीन जिल्ह्यांमध्ये दाखल आहेत . 

सोनकसवाडी येथे झालेल्या दरोड्या प्रकरणी गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही होण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्याकडे वडगांव निंबाळकर पोलिसांनी पाठविला होता. 

पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती स्थानिक गुन्हे शाखेचे पद्मावत घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, श्रीगणेश कवितके , योगेश शेलार,सहाय्यक फौजदार पोपट जाधव , सुर्यकांत कुलकर्णी, गोरख पवार,ज्ञानेश्वर सानप,बाळासाहेब  पानसरे, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ  , पोपट नाळे, सलमान खान, अक्षय सिताप यांनी केली होती .

बारामती विभागात आत्तापर्यंत १९ टोळीतील १२५ आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे .

Web Title: Mocca action against criminal gangs who crime in Pune, Satara and Solapur districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.