वारजेतील चार गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई; चारपैकी दोन जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 10:39 PM2021-07-13T22:39:35+5:302021-07-13T22:39:45+5:30

गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांना हवे असलेली चारही आरोपींवर आता मोक्का कारवाई

Mocca action against four criminals in Warje; Two of the four were arrested | वारजेतील चार गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई; चारपैकी दोन जण अटकेत

वारजेतील चार गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई; चारपैकी दोन जण अटकेत

googlenewsNext

वारजे :  येथील डुक्कर खिंडीत गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांना हवे असलेली चारही आरोपींवर आता मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पाच लाखांचा खंडणी प्रकरणी हा गोळीबार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४, रा. काकडे पॅलेस शेजारी कर्वेनगर)  उमेश श्रीराम चिकणे (वय २८, रा. शांती नगर कोथरूड), नकुल श्याम खाडे ( अंदाजे वय २९ रा. जुनी सांगवी, सध्या कोथरुड) व चेतन चंद्रकांत पवार (रा. मेगासिटी एसएनडीटी जवळ) अशी आरोपींची नावे आहेत. यातील येळवंडे व चिकणे यांना अटक करण्यात आले असून यांचा म्होरक्या नकुल खाडे व चेतन पवार हे अद्यापही फरारी आहेत 

गेल्या महिन्यात गोळीबार पूर्वी बांधकाम ठेकेदार रवींद्र तागुंदे यांना पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. ती न दिल्याने मागणीच्या एक महिन्यानंतर डुक्कर खिंडीजवळ या चारही आरोपींनी दोन दुचाकींवर येऊन फिर्यादी तागुंदे यांच्या दिशेने पाच वेळा गोळीबार केला होता. सुदैवाने तागुंदे या गोळीबारातून थोडक्यात बचावले होते.  पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारही आरोपींची ओळख पटवली होती. 

दोन अटक आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल, पिस्तूल, जुपिटर गाडी, सिम कार्ड, इत्यादी वस्तू जप्त केलेले आहेत. मुख्य आरोपी नकुल खाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अनेक अवैध धंद्यात तो सहभागी आहे. त्यांने आपली संघटीत गुन्हेगारी टोळी स्थापन केली असून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, शस्त्र बाळगणे अशा अनेक प्रकारचे गुन्हेगारी कृत्य सातत्याने करत आहे. याशिवाय वाहन चोरी, मारामारी, बेकायदा हत्यार, पिस्तूल यांची विक्री अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे त्यांनी वारंवार केले असून तो पोलिसांना अनेक गुन्ह्याप्रकरणी हवा आहे.

वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत मोक्काचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला होता. त्याप्रमाणे डॉ. संजय शिंदे (अप्पर पोलीस आयुक्त) यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सध्या या गोळीबार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोपे करीत आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोक्काअंतर्गत झालेली अडतिसावी कारवाई आहे.

Web Title: Mocca action against four criminals in Warje; Two of the four were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.