केअर टेकर म्हूणून रेकी करुन दराेडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई; ६ जणांवर कारवाई   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:12 PM2021-06-12T18:12:10+5:302021-06-12T18:16:07+5:30

पुणे, जालना, औरंगाबादमध्ये ७ गुन्हे

Mocca action against gangs who robbary by Reiki as a care taker; Action against 6 persons | केअर टेकर म्हूणून रेकी करुन दराेडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई; ६ जणांवर कारवाई   

केअर टेकर म्हूणून रेकी करुन दराेडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई; ६ जणांवर कारवाई   

Next

पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करताना माहिती काढून नंतर दरोडा टाकणाऱ्या संदीप हांडे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेकारी प्रतिबंधक कायदा (मोक्का)नुसार कारवाई करण्यात आली आहे.

संदीप भगवान हांडे (वय २५, रा. पिंपळ खेडा, गंगापूर औरंगाबाद), मंगेश बंडू गुंडे (वय २०, रा. वडीकाळ्या, ता. आंबड), विक्रम दिप्या थापा उर्फ बिके (वय १९, रा. इंदिरानगर, नाशिक), किशोर कल्याण चनघटे (वय २१, रा. पिंपळखेडा, ता. गंगापूर), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय २५), भारत बद्रीनाथ चनघटे (वय २१) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर पुणे, औरंगाबाद, जालना येथे ७ गुन्हे दाखल आहेत.

या टोळीचा प्रमुख हांडे आहे. या टोळीकडून पुण्यातील सिंध सोसायटी व पंचवटी सोयायटी येथे ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी, लुटलेले सोन्याचे-हिऱ्याचे दागिने असा २१ लाख रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. हांडे हा टोळीप्रमुख असून तो शहरातील विविध केअर टेकर एजन्सीच्या माध्यातून ज्येष्ठ नागरिकांकडे काही दिवस नोकरी करत होता. नोकरी केल्यानंतर त्या ठिकाणची सर्व माहिती काढून काम सोडत असे. त्यानंतर टोळीच्या माध्यामातून त्या ज्येष्ठांच्या घरी जाऊन लुटमार करत होता. गेल्या वर्षी त्याने कोथरूड परिसरातील एका ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले होते. यामध्ये अटक झाल्यानंतर तो काही दिवसांनी जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा साथीदारांच्या मदतीने अशाच पद्धतीने गुन्हे करण्यास सुरवात केली. तो शहरातील वेगवेगळ्या केअर टेकर एजन्सीच्या संपर्कात राहून काम शोधत असल्याचे समोर आले आहे.

या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव चतुशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत पाठविला होता. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मोक्का कारवाईला मान्यता दिली.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ही ३४ वी कारवाई असून या वर्षातील ही २९ वी कारवाई आहे.

Web Title: Mocca action against gangs who robbary by Reiki as a care taker; Action against 6 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.