सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:20+5:302021-06-10T04:08:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीची चोरी करून सोनसाखळी हिसकाविणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का ...

Mocca action against gold chain theft gang | सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दुचाकीची चोरी करून सोनसाखळी हिसकाविणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली आहे.

दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनील साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) आणि चोरीचे सोने घेणाऱ्या सराफ हुकुमसिंग भाटी (रा. रक्षकनगर, खराडी, चंदननगर) यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

सोनसाखळी चोरणारे चोरटे हडपसर परिसरात थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड व चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार सराईत गुन्हेगार दीपक आणि मुकेश यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तब्बल २० ठिकाणांहून सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. दीपक माळी याने टोळी तयार करून ठिकठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले होते. त्यानंतर त्याने हे सोन्याचे दागिने भाटी याला विकले होते. दीपक माळी याच्याविरुद्ध २०१५ पासून ८ गुन्हे दाखल आहेत. मुकेश साळुंखे याच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार करीत आहेत.

Web Title: Mocca action against gold chain theft gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.