पप्पू येनपूरे टोळीविराेधात मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:54+5:302021-08-22T04:12:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क` पुणे : दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घात शस्त्राद्वारे कात्रज, आंबेगाव परिसरात दहशत माजविणा-या पप्पू ...

Mocca action against Pappu Yenpure gang | पप्पू येनपूरे टोळीविराेधात मोक्का कारवाई

पप्पू येनपूरे टोळीविराेधात मोक्का कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क`

पुणे : दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घात शस्त्राद्वारे कात्रज, आंबेगाव परिसरात दहशत माजविणा-या पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळीप्रमुख प्रवीण ऊर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय २७, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द) व त्याचे साथीदार अजित अंकुश धनावडे (वय २४, रा. सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द), अभिजित नंदू बाेराटे (वय ३१, रा. आंबेगाव खुर्द) अशी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पप्पू येनपूरे हा २०१६ पासून संघटीतपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे. येनपूरे हा प्रत्येक गुन्ह्याचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेऊन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र, दहशत माजविणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केलेले आहेत. या टोळीवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच तडीपारीची कारवाई केली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक परिणाम झाला नाही. भारती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, वैभव गायकवाड, पोलीस अंमलदार कृष्णा बढे, महेश बारवकर, नीलेश ढमढेरे, अनिल शेडगे यांनी मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला. डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजूरी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

Web Title: Mocca action against Pappu Yenpure gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.