पिंपरीत दोन टोळींवर मोक्का कारवाई, सोळा जणांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 03:40 PM2021-04-16T15:40:09+5:302021-04-16T15:41:15+5:30
टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद
पिंपरी: सराईत गुन्हेगार सुरेश उर्फ बॉबी विलास यादव आणि साहिल उर्फ खाऱ्या तानाजी जगताप याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमा अंतर्गत (मोक्का) कारवाई केली. दोन्ही टोळीतील सोळा जणांवर गुन्हा दाखल करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
साहिल उर्फ खाऱ्या तानाजी जगताप (वय २३, रा आकुर्डी), रोहित हिंदुराव रकटे (वय २४, रा. आकुर्डी), शंकर लक्ष्मण दाते (वय २२, रा. चिंचवड गाव), सनी तायप्पा तलवार (वय २५, रा. आकुर्डी), आशिष केशव सुर्वे (वय २२, रा. तळवडे), नितिन राजेश सोनवणे (वय ३०, रा. चिंचवड गाव), सलमान उर्फ सलम्या अफजल खान (वय २४, रा. निगडी), कृष्णा इटकल, अबू तालिब शेख अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीवर पिंपरी चिंचवड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
दुसऱ्या घटनेत बॉबी उर्फ़ सुरेश विलास यादव (वय ३३), सनी उर्फ प्रवीण बाबूलाल सरपट्टा (वय २९, दोघे रा. आकुर्डी), प्रसाद उर्फ तांब्या लक्ष्मण सुतार (वय २६, आकुर्डी), विकी पोपट वाघ (वय २६, रा. आकुर्डी), जिग्नेश परशुराम सावंत (वय ३०, रा. चिखली), नरेंद्र उर्फ गुंड्या बाबूलाल सरपट्टा (वय २७, रा. आकुर्डी, ), कल्पेश संदीप पवार (वय २५, रा. आकुर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळी विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, दरोड्याची पूर्व तयारी , दुखापत, दंगा करणे, घरफोडी, मारामारी, अपहरण करून खून करणे असे , खुनाचा कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे १४ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि सातारा जिल्ह्यात दाखल आहेत.
निगडी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या या दोन्ही टोळ्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्फत मोका कारवाई प्रस्तावित केली होती. त्यानुसार कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.