सार्थक मिसाळ टोळीवर मोक्का कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:47+5:302021-09-12T04:14:47+5:30
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सार्थक मिसाळ टोळीतील ८ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात ...
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सार्थक मिसाळ टोळीतील ८ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
सार्थक संगीत मिसाळ (वय २०), अजय उर्फ शुभम रवींद्र हिरे (वय २३), तुकाराम रामचंद्र येनपुरे (वय ५२), तुषार प्रकाश डोंबे (वय २१), लकी उर्फ लखन अरुण गायकवाड (वय १९), तेजस उर्फ बंटी तुकाराम येनपुरे (वय २०), आदित्य उर्फ बबलू जगमोहन सिन्हा (वय १९) आणि कल्पेश अनिल यादव (वय ३२) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सार्थक मिसाळ हा टोळी प्रमुख आहे. या टोळीने जुन्या भांडणाच्या रागातून आकाश पवार याच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिसाळ टोळी २०२० पासून संघटितपणे गुन्हे करत आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांनी या टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोक्का कारवाईला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण अधिक तपास करत आहेत.