अकरा जणांवर मोक्का दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:53+5:302021-09-15T04:15:53+5:30
या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार राण्या बाणखेले याच्या खून प्रकरणात ...
या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार राण्या बाणखेले याच्या खून प्रकरणात आरोपी असलेले चेतन सत्यवान गायकवाड (वय १९, रा. आनंदवाडी नारायणगाव, मूळ रा. काळूस माळवाडी, ता. खेड), राम सुरेश जाधव (वय २२, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड मूळ रा. येनवे, ता. जुन्नर), सौरभ कैलास पोखरकर (वय १९, रा.डोबीमळा, मंचर ता. आंबेगाव), आकाश संतोष खैरे (वय २०, रा.सानेवस्ती, वारूळवाडी, ता.जुन्नर), लुट्या ऊर्फ तुषार नितीन मोरडे (वय २३, रा.मोरडेवाडी, मंचर ता.आंबेगाव), पवन सुधीर थोरात (वय २२, रा.जुना चांडोली रोड, मंचर, ता. आंबेगाव), वैभव शांताराम तिटकारे (वय १९, रा.चिखली जळकेवाडी, ता. आंबेगाव), राजेश दगडू साळवे (वय ४९, रा. कळंब, ता. आंबेगाव) व इतर दोन १६ वर्षीय अल्पवयीन मुले यांनी संघटित टोळी तयार करून राण्या बाणखेलेचा खून केला होता. टोळी प्रमुख पवन सुधीर थोरात याच्या नेतृत्वाखाली संघटित टोळी तयार करून मंचर व आंबेगाव तालुक्यात दहशत निर्माण केली. पवन थोरात याने स्वतः व टोळीतील विविध सदस्यांमार्फत १४ स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने टोळीच्या या कृत्यातून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार मोक्का लावण्यात आला आहे.