कुंजीरवाडीच्या सरपंचांना मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:14+5:302021-08-17T04:16:14+5:30

शुभम कैलास कामठे (वय २६, रा. कदमवस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यात ...

Moccas court grants bail to Kunjirwadi sarpanch | कुंजीरवाडीच्या सरपंचांना मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

कुंजीरवाडीच्या सरपंचांना मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

Next

शुभम कैलास कामठे (वय २६, रा. कदमवस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. शुभम हा फरार होता. या काळात कुंजीरवाडीच्या सरपंच अंजू गायकवाड यांनादेखील मोक्कात अटक झाली होती. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभम कामठे हे नाव न सांगता अक्षय नलावडे हे खोटे नाव सांगून त्याची कोरोना टेस्ट करून घेतली होती. याचबरोबर कामठेला फरार कालावधीत मदत केल्याचा आरोप पोलिसांनी गायकवाड याच्यावर ठेवला होता.

अंजू गायकवाड येरवडा मध्यवर्ती कारागृहात असून, त्यांच्या जामीनसाठी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी विशेष मोक्का न्यायाधीश एस. ए. नावंदर यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. सरपंच गायकवाड यांना केवळ राजकीय द्वेषातून अडवकले आहे. कोरोनाची चाचणी करतेवेळी ती व्यक्ती ही आरोपी असल्याचे सरपंच गायकवाड यांना माहीत नसल्याचा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष मोक्का न्यायाधीश मे. एस. ए. नावंदर यांनी अंजू गायकवाड जामिनावर मुक्त केले आहे. गायकवाड यांच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. शिवम पोतदार व अक्षय खडसरे यांनी काम पाहिले आहे.

Web Title: Moccas court grants bail to Kunjirwadi sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.