मोदी सरकारला सत्तेतून घालवा - जी. रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:04 AM2018-12-25T01:04:45+5:302018-12-25T01:05:01+5:30

कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून घालवायला हवे.

Modi government should be out from power - G. Reddy | मोदी सरकारला सत्तेतून घालवा - जी. रेड्डी

मोदी सरकारला सत्तेतून घालवा - जी. रेड्डी

Next

पिंपरी : कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून घालवायला हवे. त्यासाठी देशभरातील कोट्यवधी कामगारांनी ८ व ९ जानेवारी, २०१९ ला पुकारलेल्या अखिल भारतीय संपात सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार संघटना कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जी. संजिवा रेड्डी यांनी केले.
विविध क्षेत्रांतील कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करण्यासाठी देशभरातील कामगारांचा सर्व संघटनांच्या वतीने संप पुकारण्यात आला असून, त्याची घोषणा रेड्डी यांनी सोमवारी पिंपरी येथे केली. या वेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ कामगार नेते म. वि. अकोलकर, अजित अभ्यंकर, दिलीप पवार, मनोहर गाडेकर, अनिल आवटी, शशिकांत धुमाळ, वसंत पवार, अनिल रोहम, यशवंत सुपेकर,ृ आदी उपस्थित होते.
या वेळी रेड्डी म्हणाले की, केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यांसह संरक्षण क्षेत्रातदेखील कंत्राटीकरण करीत आहे.

या संपात इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयूसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बँक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राज्य सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पथारी, असंघटित सर्व कर्मचारी संघटना सहभागी होतील, अशीही माहिती रेड्डी यांनी दिली.

Web Title: Modi government should be out from power - G. Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.