मोदीभक्ताला मोदींकडून असाही ‘प्रसाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:57+5:302021-08-22T04:14:57+5:30

------------------------ ...म्हणून बारामतीकरांना लवकर उठण्याची सवय अजित पवारांच्या कार्यक्रमांच्या वेळांमुळे सरकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा त्रस्त असते. कारण ...

Modi offers such 'prasad' to Modi devotees | मोदीभक्ताला मोदींकडून असाही ‘प्रसाद’

मोदीभक्ताला मोदींकडून असाही ‘प्रसाद’

Next

------------------------

...म्हणून बारामतीकरांना लवकर उठण्याची सवय अजित पवारांच्या कार्यक्रमांच्या वेळांमुळे सरकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा त्रस्त असते. कारण सकाळी साडेपाच वाजल्यापासून कोणत्याही वेळेला त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम सुरू होऊ शकतात. त्यामुळे पवार जिल्ह्यात असले की प्रशासकीय अधिकारी, पोलीस, पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनाही एकदम ‘अलर्ट मोड’वर राहावे लागते. कधी त्यांच्याकडून सांगावा येईल याचा नेम नसतो. भल्या पहाटे कामाला सुरुवात करण्याची सवय कशी लागली आणि का हे अजित पवारांनी नुकतेच सांगितले. ते म्हणाले, “पवारसाहेबांमुळे (म्हणजे शरद पवार) आम्हा बारामतीकरांना सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागली. मध्यरात्री दीड-दोन पर्यंत काम करून सकाळी सात वाजता काम सुरू करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांचा आदर्श घेतल्याने आम्हालाही लवकर उठण्याची सवय लागली. वेळेत काम केल्याने कामेही मार्गी लागतात.” अजित पवारांना हेही माहिती आहे की यामुळे इतरांची तारांबळ उडते. त्यावर त्यांचे म्हणणे असे की, कोणाला त्रास देण्याची भूमिका नसते. लवकर काम सुरू केले की इतर कामांनाही वेळ देता येतो. गंमत म्हणजे हा किस्सा ज्या कार्यक्रमात अजितदादांनी सांगितला तो कार्यक्रमसुद्धा सकाळी पावणेसातलाच सुरू झाला बरं का.

---------------

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या ‘भगिनी’

बड्या लोकांशी नातं जुळवण्याची हौस अनेकांना असते. हे बडेपण मग आर्थिक असो किंवा सत्तेचं असो. या वलयाशी काहीही करून जोडून घेण्याची धडपड केली जाते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री. सध्याचे विरोधी पक्षनेते. शिवाय राष्ट्रीय पक्षाचे तरुण नेतृत्व असल्याने राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातलं लांब पल्ल्याचं व्यक्तिमत्त्व. साहजिकच फडणवीस यांच्याशी सलगी ठेवून असण्याचे फायदे दीर्घकालीन. त्यामुळे त्यांच्याशी जोडून घेण्याची धडपड ते जिथे जातील तिथे असतेच. नुकतेच ते पुणे जिल्ह्यात आले होते. तेव्हा हेच घडले. भाजपाच्या जिल्ह्यातल्या एका आमदाराच्या घरी ते गेले होते. यावेळी या आमदारांच्या पत्नीने फडणवीसांना राखी बांधली. एखादा सण होऊन गेल्यानंतर पुढचे काही दिवस तो साजरा करण्याची पद्धत असते. पण या आमदारांच्या घरी राखी पौर्णिमेच्या आधीच हा कार्यक्रम ‘उरकरण्यात’ आला. भिडस्त स्वभावाच्या फडणवीसांनीही गुमान राखी बांधून घेतली. त्यानंतर भावाबहिणीच्या नात्यापेक्षा चर्चा जास्त सुुरू झाली बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुढच्या निवडणुकीची.

Web Title: Modi offers such 'prasad' to Modi devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.