माेदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवितात : उपेंद्र कुशवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 09:20 PM2018-12-12T21:20:00+5:302018-12-12T21:21:39+5:30

विद्यमान केंद्र सरकारमध्ये मी स्वत: मंत्री होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन्य मंत्र्यांवर कशी दहशत आहे त्याचा अनुभव घेतला आहे. त्यांचा केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे अशी घणाघाती टीका केंद्र सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केली.

modi proposed the agenda of rss says upendra kushvah | माेदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवितात : उपेंद्र कुशवाह

माेदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवितात : उपेंद्र कुशवाह

Next

पुणे : विद्यमान केंद्र सरकारमध्ये मी स्वत: मंत्री होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन्य मंत्र्यांवर कशी दहशत आहे त्याचा अनुभव घेतला आहे. त्यांचा केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे अशी घणाघाती टीका केंद्र सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केली.


    एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले असताना कुशवाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भूजबळ त्यांच्यासमवेत होते. कुशवाह म्हणाले, आम्हाला सामाजिक न्यायाच्या आणाभाका देण्यात आल्या होत्या, परंतू त्यांचा  केवळ संघाचा अजेंडा आहे. तो आम्हांला मान्य नाही. भाजपा सरकारने जे जे सांगितले त्याच्या बरोबर उलटे ते वागत आहेत. त्यामुळेच आता त्यांच्याकडून कसलीही आशा राहिलेली नाही. मंत्री म्हणून मला आलेला अनुभव आहे की कोणाशीही सल्ला मसलत न करता पीएमओ कार्यालयाकडून केवळ आदेश येतात आणि मंत्र्यांना ते पाळावे लागतात. 

    भूजबळ म्हणाले, पाच राज्यातील विधानसभांचे निकाल हेच सांगत आहेत की जनतेला अच्छे दिन ची फसवेगिरी नको आहे, तर हमारे दिन पाहिजे आहेत. सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. हे सरकार सत्तेवर आले व देशाचे अकल्याणच सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ नाही. अनेक आरोप होऊनही ते त्याचे निराकरण करण्यासाठी तयार नाहीत. त्यांचे सरकार आले विकासाच्या मुद्द्यावर, पण साडेचार वर्षात काहीच केले नाही.आता राम मंदिराच्या मुद्द्यावर देशात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करत आहेत. जनतेने त्यांना ५ राज्यांमधून मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही जनता त्यांना उभे करणार नाही.’’


    तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, भाजपातून तसेच त्यांच्या आघाडीतून आता अनेकजण बाहेर पडत आहेत. राष्ट्रवादीमधून तिथे गेलेल्यांना आता परतीची ओढ लागली आहे असे भूजबळ म्हणाले. त्यांना पुन्हा पक्षात घेणार का यावर त्यांनी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगितले. पक्षाने आदेश दिला की कोणतीही निवडणूक लढवण्यात आपण तयार आहोत असे ते म्हणाले.

Web Title: modi proposed the agenda of rss says upendra kushvah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.