शिरूर शहरात मोहरमचा सोहळा शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:19+5:302021-08-22T04:13:19+5:30
आमदार अशोक पवार यांनी या सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. बारा इमाम कोठला व इमाम कासम कोठला येथे तेथील ...
आमदार अशोक पवार यांनी या सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. बारा इमाम कोठला व इमाम कासम कोठला येथे तेथील मुजावरांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर, बारा इमाम व इमाम ए कासम कोठल्याच्या सवाऱ्या ''थंड'' करण्यात आल्या. सुभाष चौकातील ढालसाल, कुंभार
आळीतील बाबू डोंगरे, नजीर शहा व बेग समाजाच्या वतीने सवाऱ्यांची स्थापना केली होती. या सवाऱ्यांचेही विधिवत विसर्जन करण्यात आले. हुसेन शहा यांनी धार्मिक विधी पार पाडले. ''फातेहा'' पढल्यानंतर (नवसपूर्ती) या ताबुतांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तालामुल्ला व मलंगशा दर्ग्याच्या ताबुतांचेही जागेवरच विसर्जन विधी करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष (स्व.) शहीदखान पठाण यांच्या ''छालवाले'' ताबुताची विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शरद कालेवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, भाजपचे शहर कार्याध्यक्ष मितेश गादिया, बाळासाहेब घावटे, केरूभाऊ गाडेकर आदी या वेळी उपस्थित होते.