मोहसीन शेख हत्या प्रकरण: हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 07:31 PM2023-01-27T19:31:21+5:302023-01-27T19:32:08+5:30

आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती...

Mohsin Sheikh murder case: acquittal of Hindu Rashtra Sena president Dhananjay Desai | मोहसीन शेख हत्या प्रकरण: हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईची निर्दोष मुक्तता

मोहसीन शेख हत्या प्रकरण: हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईची निर्दोष मुक्तता

googlenewsNext

पुणे : पुण्यातील मोहसीन शेख हत्येप्रकरणातील आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने देसाई यांची निर्दोष मुक्तता केली आहे. २०१४ मध्ये त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झालेला होता. यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह यांच्यासह २३ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोलापुरातील काही तरुणांनी 'जस्टिस फॉर मोहसिन' ही चळवळ देखील सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसर मध्ये दंगल झाली होती.

त्यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने तोडफोड केली होती. याचवेळी मोहसिनला त्याची दाढी आणि पेहरावावरुन त्यांनी हटकलं आणि त्याला मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. २०१९ धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Web Title: Mohsin Sheikh murder case: acquittal of Hindu Rashtra Sena president Dhananjay Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.