मोमीनपु-यामध्ये बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे आग

By Admin | Published: June 21, 2017 08:39 PM2017-06-21T20:39:15+5:302017-06-21T20:39:15+5:30

शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवार पेठेतील मोमीनपुरा भागातील रोलेक्स बेकरीला बुधवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली

Moinpu - The bakery has a short circuit due to fire | मोमीनपु-यामध्ये बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे आग

मोमीनपु-यामध्ये बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे आग

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 -  शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवार पेठेतील मोमीनपुरा भागातील रोलेक्स बेकरीला बुधवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. प्रसंगावधान राखत कार्यकर्त्यांनी रेडीयन्स हयात इमारतीमधील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तातडीने बाहेर काढले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या पाचच मिनिटात घटनास्थळी धाव घेत आग विझविली.
मोमीनपुरा भागामध्ये रेडीयन्स हयात नावाची इमारत आहे. त्याच्या तळ मजल्यावर रोलेक्स बेकरी आहे. बेकरीमध्ये कामगार काम करीत असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणातच ही आग संपुर्ण बेकरीमध्ये पसरली. सर्व कामगार बेकरीबाहेर पळाल्याने बचावले. स्थानिक कार्यकर्ते फरीद शेख, आरीफ उमर शेख, फारुक उमर शेख, यासिन भाई शेख, मेहबूब रोड्डे यांनी तातडीने इमारतीमधील सर्व रहिवाशांना आग लागल्याची कल्पना दिली. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांना तातडीने इमारतीबाहेर काढले.
दरम्यान, अग्निशामक दलाला याची माहिती कळविण्यात आली. अवघ्या पाचच मिनिटात अग्निशामक दलाचा बंब जवानांसह घटनास्थळी दाखल झाला. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमध्ये बेकरीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. बेकरीचे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

Web Title: Moinpu - The bakery has a short circuit due to fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.