मोक्काच्या आरोपीवर इतर कैद्यांकडून हल्ला; येरवडा मध्यवर्ती कारागृहातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:54 IST2024-06-18T09:53:55+5:302024-06-18T09:54:04+5:30
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेला आरोपी योगेश जगदीश सोनवणे याच्यावर कारागृहातील इतर आरोपींनी हल्ला केला असून, त्याला ...

मोक्काच्या आरोपीवर इतर कैद्यांकडून हल्ला; येरवडा मध्यवर्ती कारागृहातील घटना
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेला आरोपी योगेश जगदीश सोनवणे याच्यावर कारागृहातील इतर आरोपींनी हल्ला केला असून, त्याला त्वरित ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आरोपीच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी हा चोरी आणि मोक्का या खटल्यामध्ये कारागृहात होता. त्याच्या केसमधील जामीन अर्जावर दि. २१ जून रोजी रोजी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच चोरीच्या गुन्ह्यातून त्याची सुटका झाली होती. मोक्का लागल्यामुळे पुन्हा त्याला अटक करण्यात आली होती अशी माहिती त्याचे वकील सुशांत तायडे यांनी दिली.