साडेचार कोटींचा दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 05:36 PM2020-09-19T17:36:20+5:302020-09-19T17:39:06+5:30

आरोपीने महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील दरोडे टाकले आहेत.

Mokka action against a other state gang who looted Rs 4.5 crore | साडेचार कोटींचा दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

साडेचार कोटींचा दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

Next
ठळक मुद्देगुन्हयातील ३,८९,३४,७९२ रुपयांचा माल ,दोन ट्रक आरोपींकडून जप्त

बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोरगाव नीरा रोडवर २४ जुन रोजी सिगारेट घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकुन ४.५० कोटी रुपयांचा कंटेनर लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई केली आहे. आरोपीने महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील दरोडे टाकले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. 

सविस्तर घटना अशी की, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव - निरा रोडवरून दि २४ जून २०२० रोजी आयशर ट्रक नं ( एन एल ०१ एल ४३३९ ) ट्रकमध्ये रांजणगाव येथून निघालेल्या आयटीसी कंपनीची फिल्टर सिगारेट बॉक्स ४,६१,८८,८२० रुपयांचा माल घेऊन ट्रक कर्नाटक हुबळी याठिकाणी घेवुन जात असताना दुपारी २.०० वा. सुमा मोरगाव (ता बारामती) गावाच्या हद्दीत मोरगाव -निरा रोडवर १३ अज्ञात व्यक्तींनी ट्रकवर दरोडा टाकला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड यांच्या पथकाने वडगाव निंबाळकर पोलिसांनी या दरोडा प्रकरणातील गुन्हयातील कल्याणसिंग सदुलसिंग चौहान ( वय ४४ रा ओढ ता सोनकच जि देवास) ओमप्रकाश कृष्णा झाला (वय ३८ रा. भैरवखेडी ता.टोकखुर्द जि. देवास ) दिनेश वासुदेव झाला (वय ५० रा. टोककला ता. टोंकखुर्द जि. देवास ) सुशिल राजेंद्र झाला (वय ३७ रा. टोककला ता. टोंकखुर्द जि. देवास ) मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया ( वय ४२ रा भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास ) सतिश अंतरसिह झांझा ( वय ४० रा. ओढ ता. सोनकच जि. देवास ) मनोज केसरसिंग गुडेन ( वय ४० रा. ओढ ता. सोनकच जि. देवास ) या आरोपींना अटक केली. गुन्हयातील ३,८९,३४,७९२( तीन कोटी एकोण नव्वद लाख, चौतीस हजार सातशे ब्यान्नव) रुपयांचा माल ,दोन ट्रक आरोपींकडून जप्त करण्यात आला. आरोपींवर आधी महाराष्ट्र राज्यातील यवत, शिक्रापूर ,शनि शिंगणापुर पोलीस स्टेशच्या हद्दीत तसेच कर्नाटक, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल , ओरिसा, हरियाणा राज्यात आरोपींवर औषध ,सिगारेट च्या ट्रकवर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी अनेक राज्यात दरोड्याचे गुन्हे केल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक, संदीप पाटील अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, गणेश कवितके,विठठल कदम, भाउसाहेब मारकड, अमोल भुजबळ हे या तपास कामात सहभागी होते.प्रभारी पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी सर्व टीमला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 
 

Web Title: Mokka action against a other state gang who looted Rs 4.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.