महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विनयभंग, शरीरसुखाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:34 AM2018-10-26T01:34:05+5:302018-10-26T01:34:09+5:30
महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिका-याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिका-याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी एका ३१ वर्षांच्या महिला अधिकाºयाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुख्य आरोग्य निरीक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़
बाळासाहेब साबळे असे या अधिकाºयाचे नाव आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला अधिकारी जून २०१८ पासून महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत़ या पूर्वीही ते दुसºया क्षेत्रीय कार्यालयात एकत्र कार्यरत होते़ त्यावेळीही साबळे तिला त्रास देत होते़
जून २०१८ ते २४ आॅक्टोबर २०१८ दरम्यान साबळे यांनी या महिलेला वारंवार फोन करून व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली़ तसेच दुसºया अधिकाºयांना सांगून तिला कामासाठी माझ्याकडे एकटीला पाठव, असे सांगत असे़ या महिलेला कामानिमित्त २४ आॅक्टोबर रोजी कोरेगाव पार्क येथे बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली़ ‘तू मला खूप आवडते़ आपले संबंध आले तर कोणाला काही प्रॉब्लेम असणार नाही’, असे म्हणून तिला ते कॅबने विमाननगर येथे घेऊन जाणार होते़ पण तिने आॅफिसमध्ये काम आहे, असे सांगून त्यांना नकार दिला व त्या रिक्षासाठी जाऊ लागल्या़ तेव्हा त्यांनी तिचा हात धरला़ त्यांनी तो झिडकावून रिक्षाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात आल्या़, असे फिर्यादीत म्हटले आहे़ साबळे हे त्रास देत असल्याचे त्यांच्या पतीला माहिती होते़ ते ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आले होते़ त्या आल्यानंतर दोघे जण बंडगार्डन पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फिर्याद दिली़ त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयंभगाचा गुन्हा दाखल केला आहे़
>विशाखा समितीकडे तक्रार नाही
वरिष्ठाने विनयभंग केला, असा आरोप करणाºया पालिकेतील महिलेने याबाबत महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार केली नव्हती, असे या समितीच्या अध्यक्ष व मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी सांगितले. क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही विशाखा समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त अरुण खिलारी यांना याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.