मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:10 IST2024-06-05T13:08:37+5:302024-06-05T13:10:02+5:30
आरोपीने मैत्रिणीसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांना हडपसर येथे बोलावून घेतले...

मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना
पुणे : मैत्रिणीसोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन विवाहितेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली, तसेच विवाहितेला धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार ऑगस्ट २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी धाराशिव येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत २७ वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी (दि.३) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ब्रह्मदेव विठ्ठल मांजरे (२६, रा. परांडा, जि. धाराशिव) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचा त्यांच्या मैत्रिणीसोबत वाद झाला होता. आरोपीने मैत्रिणीसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांना हडपसर येथे बोलावून घेतले.
फिर्यादी हडपसर येथे आल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवला, तसेच आरोपीने त्याच्या खोलीवर नेऊन महिलेसोबत संबंध ठेवून त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ व फोटो काढले. ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवला, तसेच पतीची नोकरी घालवण्याची धमकी देऊन पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुलाणी करत आहेत.