सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:52 PM2024-08-27T15:52:53+5:302024-08-27T15:53:38+5:30
कुटुंबीय मुलीचा शोध घेताना पाहून त्या तरुणांनी मुलीला मोटार सायकलवरून रस्त्यावर ढकलून दिले
राजगुरूनगर: दावडी ( ता खेड ) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन आरोपींवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक बाळासाहेब दौंडकर (वय १९ )व निखील दत्तात्रय दौंडकर (वय १९ ) दोघे रा. दौंडकरवाडी, ता. खेड ) अशी आरोपींची नावे आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडित अल्पवयीन मुलीला दि २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ऋतिक दौंडकर याने फोन करून तु माझ्या सोबत चल तु जर आली नाही तर तुला जिवे ठार मारेल अशी धमकी देऊन घराबाहेर बोलावुन घेतले. मोटार सायकलवर बसवून दावडी परिसरातील फॉरेस्टच्या जागेत नेले. मुलीसोबत जबरदस्तीने शारिरिक सबंध करण्यासाठी तिचे कपडे बळजबरीने काढुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. निखील दौंडकर याने या प्रकाराला मदत केली. मुलगी घरात नाही हे कुटुंबाला समजल्यावर शोध घेतला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरापासुन काही अंतरावर माळावर गेले असता कुटुंबिय आलेचे पाहुन ऋतिक दौंडकर व निखील दौंडकर यांनी पीडित मुलीस मोटार सायकलवरून खाली ढकलुन दिले. यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक स्नेहल गुरव करीत आहे.