Pimpri Chinchwad | राजकीय पदाधिकारी असलेल्या इंजिनियर महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:45 IST2023-02-23T15:41:04+5:302023-02-23T15:45:15+5:30
हा प्रकार मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाणेर येथे घडला...

Pimpri Chinchwad | राजकीय पदाधिकारी असलेल्या इंजिनियर महिलेचा विनयभंग
पिंपरी :पुणे येथे राजकीय पदाधिकारी असलेल्या इंजिनियर महिलेबाबत सोशल मीडियावरून अश्लील कमेंट प्रसारीत केली. मनास लज्जा निर्माण करून विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सातच्या सुमारास बाणेर येथे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार देवेंद्र जोडमोटे (रा. सोलापूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित फिर्यादी महिला इलेक्ट्राॅनिक्स इंजिनियर असून एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तसेच एका राजकीय पक्षाची स्थानिक पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.
आरोपीने फिर्यादी महिलेबाबत फेसबुकवर अश्लील कमेंट प्रसारीत केली. यामुळे पीडित महिलेच्या मनास लज्जा निर्माण झाली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.