पहिले लग्न लपवून तरुणीवर बलात्कार, भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:38 PM2024-06-05T12:38:38+5:302024-06-05T12:40:01+5:30
पीडित मुलगी घरात एकटी असताना लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले....
पुणे : पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केली असता मारहाण केली. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते जून २०२४ दरम्यान पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत २८ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. ३) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गौरव उर्फ सनी चंद्रकांत पासलकर (रा. राजे चौक, आंबेगाव पठार) याला अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, आरोपीने त्याचे लग्न झालेले असताना पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडित मुलगी घरात एकटी असताना लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, पीडित मुलीला आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर तिने याबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच तुला काय करायचे ते कर मी बघून घेईन, असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक मिठारे तपास करत आहेत.