फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:55 PM2021-10-18T14:55:46+5:302021-10-18T14:55:46+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा युट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला...

molestation women giving jobs film industry kondhava crime news | फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार

googlenewsNext

पुणे : फिल्म इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे आमिष दाखवून एका महिलेला आपल्या वासनाची शिकार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समीर बाळू निकम (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) याला अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादी व आरोपीच्या घरी सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा यु ट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला. युट्युबवर बनविलेल्या शॉर्ट फिल्मची गाणी त्यांना दाखवून त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: molestation women giving jobs film industry kondhava crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.