सोमवारी १०७ कोरोनाबाधित : २३९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:09+5:302021-09-14T04:14:09+5:30
पुणे : शहरात सोमवारी १०७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ ...
पुणे : शहरात सोमवारी १०७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ६०३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.९० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या आज पुन्हा २ हजारच्या आत आली असून, आजमितीला १ हजार ९०५ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०५ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७६ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ३८ हजार ६९४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार २९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८७ हजार ४०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती :
सोमवारी बाधित : १०७
घरी सोडले : २३९
एकूण बाधित रुग्ण : ४,९८,२९०
सक्रिय रुग्ण : १,९०५
आजचे मृत्यू : ०७
एकूण मृत्यू : ८,९८१